S M L

जगनमोहन रेड्डींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Sachin Salve | Updated On: Oct 10, 2013 05:23 PM IST

जगनमोहन रेड्डींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

jaganmohan reddy10 ऑक्टोबर : स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर उपोषण करणारे YSR काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं. जगनमोहन हे शनिवारी उपोषणाला बसले होते.

 

त्यांची तब्येत खालावत होती. तसंच त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची भीती होती.त्यामुळे पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांना निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचारांसाठी दाखल केलं आहे.

 

त्यानंतर त्यांना सलाईनद्वारे अन्नपुरवठा सुरू झाला. जगनमोहन यांची प्रकृती खालावली होती, हे वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केलं, मात्र रात्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2013 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close