S M L

सत्यमला खरेदी करण्यासाठी विदेशी कंपन्या उत्सुक

4 फेब्रुवारी मुंबईसत्यमविषयी मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या येत असल्यातरी कंपनीमध्ये मात्र कर्मचा-यांचं मनोधैर्य वाढवणारे इ-मेल्स पाठवले जात आहेत. कंपनीला 95 टक्क्यांपर्यंत व्यवसाय देणारे टॉप 20 क्लायंट्स अजूनही कंपनीसोबतच असून अनेकांनी आपले कॉन्ट्रक्टस नव्याने केले असल्याचं या मेलमध्ये म्हटलंय. कंपनीच्या चार मोठ्या क्लायंट्सनी आपण सत्यमबरोबरच राहणार असल्याचं सांगितलं असून सत्यमला सहा महिन्यांचा नवा नेटवर्किंग प्रोजेक्ट मिळाल्याचंही यात म्हटलंय. कंपनीत खरोखरच 53 हजार कर्मचारी असल्याचं या इ-मेलमध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान सत्यम कंपनीला खरेदी करण्यासाठी सहा ते सात देशी आणि विदेशी कंपन्या उत्सुक आहेत. कंपनीला सध्या सुमारे 600 ते 700 कोटींची गरज आहे. कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. या पैशातून कंपनीला कर्मचा-यांचा पगार, जागेचं भाडं यांसारखी आर्थिक देणी भागवायची आहे. काही सरकारी बँकांकडून 1700 कोटीं रुपयांचं कर्ज काढण्याच्या विचारातही कंपनी आहे. त्यासाठी सत्यमच्या सगळया जागा गहाण ठेवल्या जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 01:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close