S M L

मोदींना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात?

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2013 06:39 PM IST

मोदींना टक्कर देण्यासाठी प्रियांका गांधी मैदानात?

priynaka gandhi 44414 ऑक्टोबर : येत्या लोकसभा निवडणुका जसजश्या जवळ येतायत तसतसं राजकीय वातावरण अधिकच तापत चाललंय. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी सध्या देशभर सभांचा धडाका लावलाय. आता त्यात आणखी एका गांधींची भर पडणार अशी आता चर्चा सुरू झालीय. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी आता राजकारणात अधिक सक्रिय होणार आहेत.

 

एवढच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत फक्त उत्तर प्रदेशात नाही तर प्रियांका देशभर प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नरेंद्र मोदींनी सध्या देशभर भाषणाचा धडाका लावलाय. आणि त्याला उत्तर देण्यासाठी प्रियांका गांधींना निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

काँग्रेसने मात्र या बातमीचं खंडन केलंय. अशा प्रकारचा कोणताही निर्णय काँग्रेसनं घेतला नसल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी म्हटलंय. रतनगड मंदिरात रविवारी चेंगराचेंगरीवरुन लक्ष हटवण्यासाठी हा भ्रम निर्माण केला जात असल्याचं माकन यांनी म्हटलंय. तर भाजपनं मात्र असा काही निर्णय झालेला असल्यास तो काँग्रेसच्या घराणेशाहीच्या परंपरेला साजेसा असल्याची बोचरी टीका केली. नरेंद्र मोदींच्या वाढत्या प्रचारामुळेच काँग्रेस अशा पद्धतीचा विचार करत असल्याची टीकाही भाजपनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2013 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close