S M L

भाजपला संधी द्या, बदल घडवून दाखवतो -मोदी

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2013 05:35 PM IST

Image img_234942_narendramodi5445_240x180.jpg17 ऑक्टोबर :  भाजपला पाच वर्षे संधी द्या, आम्ही बदल घडवू असं आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलंय. गांधीनगरमध्ये आज राष्ट्रीय नगर परिषद झाली. त्यावेळी बोलताना मोदी यांनी अप्रत्यक्षपणे हे आवाहन केलंय.

 

भाजपला पाच वर्षांची सत्ता मिळाली तर आम्ही देशात बदल घडवून दाखवू आणि हा बदल असा असेल की तो लोकांच्या पसंती उतरले आणि त्यांच्या लक्षातही राहिल. गांधीनगर इथं राष्ट्रीय नगर परिषदेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी शहरांच्या विकासाच्या मुद्यावर अधीक भर दिला.

 

आज 35 टक्के लोक शहरात राहतात. देशाच्या आर्थिक विकासाची मुख्य केंद्र शहर असून रोजगारासाठी केंद्रबिंदू आहे. जर या शहरांचा विकास झाला तर देशाच्या तिसर्‍या हिस्याचा विकास होईल. आपल्याला चांगल्या गोष्टींचा नेहमी अवलंब केला पाहिजे आपल्याकडे जे काही स्त्रोत आहे त्यावर अधिक भर दिला पाहिजे असंही मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2013 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close