S M L

पाकला चोख प्रत्युत्तर द्या, ओमर अब्दुल्लांची मागणी

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2013 11:05 PM IST

पाकला चोख प्रत्युत्तर द्या, ओमर अब्दुल्लांची मागणी

omar abdula 421 ऑक्टोबर : पाकिस्तानचे ना'पाक' हल्ले सुरुच आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून रविवारी रात्रभर तब्बल 20 वेगवेगळ्या भागांमध्ये गोळीबार सुरू होता. यावर आता जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कडक शब्दत प्रतिक्रिया दिलीय.

 

पाकिस्तानच्या या आगळिकीवर केद्रानं 'इतर पर्यायांचा' विचार करावा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केलीय. भारत नेहमीच सहन करू शकत नाही अशी भावना अब्दुलांनी व्यक्त केलीय.

 

पाकिस्तानकडून होणार्‍या या वाढत्या गोळीबारामुळे सीमेजवळच्या गावांमध्ये मोठी भीती पसरलीय. त्यामुळे गावकरी गाव सोडून जात आहेत. याचा परिणाम शाळांवरही झाला असून अनेक शाळाही बंद आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2013 11:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close