S M L

जळगावमध्ये विद्यार्थ्यांचं उमेदवार नाकारण्यासाठी आंदोलन

5 फेब्रुवारी, जळगाव प्रशांत बाग नको असलेल्या उमेदवाराला नाकारण्याच्या अधिकारासाठी जळगामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. प्रत्येकाला मतदान सक्तीचं करणारा कायदा करण्याचीही विद्यार्थ्यांनी आयोगाकडं मागणी केलीये. कमी मतदानामुळं आपल्या प्रभावाचा वापर करून निवडून येणारा उमेदवार जनतेचं काय भलं करणार हा प्रश्नही आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थीत केलाय. आंदोलक महाविद्यालयीन विद्यार्थी यंदा पहिल्यांदाच त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.आपलं प्रमाणीक मत द्यावं असा एकही उमेदवार निवडणूक लढवीत नाही असं आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण अपात्र उमेदवाराला टाळण्यासाठी फॉर्म 17 - ए ची तरतुद केली आहे. ही तरतुद ही गुप्तता पाळू शकत नसल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. " इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरच व्हेटो अधिकार नावाचं एक बटन आम्हाला देण्यात यावं. ज्यामुळे गुप्ततेचा सिध्दांत भंग होणार नाही आणि निर्भय व निष्पक्षपणे आपण आपलं मत मांडू शकू " असं मत विद्यार्थी राजकुमार ककारिया या विद्यार्थ्यांनं व्यक्त केलं आहे. उमेदवाराला नाकारण्याच्या अधिकाराच्या आंदोलनात मुलींचा पुढाकार हा लक्षणीय आहे. निवडणुक आयोग आणि कोर्टाकडेही विद्यार्थिनींनी ही मागणी केलीय. आपल्या अनैतिक प्रभावानं जिंकणा-या उमेदवारांना चपराक देण्यासाठी नकारात्मक मतदानाचं अधिकार द्यावा अशी प्रमुख मागणी या विद्यार्थिनींनी केलीय. " झालेल्या मतदानामधे जर नकारात्मक मतदानाचं प्रमाण अधिक झालं असेल, तर अश्या वेळेस निवडणुक आयोगाने तिथली निवडणूक रद्द करून त्याठिकाणी आयोगानं तिथे केन्द्रसाशित प्रदेश जाहीर करावा आणि दुसरी मागणी अशी आहे की मतदान कंपंलसरीचा कायदा हा झाला पाहिजे, " अशी मागणी कीर्ती सरोदे या विद्यार्थिनीची आहे. जळगांव जिल्ह्यांत होणा-या येत्या निवडणुकांमधे 23 टक्के मतदार हे युवा मतदार आहेत. कमी मतदान झाल्यावर सुध्दा निवडून येणा-या उमेदवाराला नाकारण्याचा अधिकार त्यांना हवाय. आणि याकरीता विद्यार्थी आंदोलन करतायत. तेही पक्षविरहित. पण महाविद्यालयाचे विद्यार्थी.सरासरी 50 टक्के झालेल्या मतदानातून 20 टक्के मत मिळवणारा उमेदवार हा 100 टक्के लोकांचं प्रतिनिधित्त्व करतो. ही लोकशाहीची थट्टा असल्यानं आमचा हा हक्क मिळालांच पाहिजे, अशी आग्रही भूमिका जळगावच्या युवा मतदार विद्यार्थ्यांनी घेतलीय. त्यांचं हे आंदोलन पाहता थक्क व्हायला होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 12:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close