S M L

पाटणा स्फोटांमागे 'इंडियन मुजाहिद्दीन'चा हात ?

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2013 02:13 PM IST

पाटणा स्फोटांमागे 'इंडियन मुजाहिद्दीन'चा हात ?

patna blast_new28 ऑक्टोबर : बिहारची राजधानी पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा एनआयएने संशय व्यक्त केला. तसंच इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तहसीन अख्तर यामागचा मास्टरमाइंड असल्याचं गृह खात्याच्या सूत्रांनी सांगितलंय.

 

त्याचबरोबर मुझफ्फरनगर दंगलीचा सूड घेण्यासाठी हे स्फोट घडवल्याचं संशयितांनी सांगितल्याचा बिहार पोलिसांचा दावा आहे. रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अगोदर सहा स्फोट झाले होते. या स्फोटासाठी बॉम्ब ठेवताना जखमी झालेल्या एका संशयिताचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 6 झालीये.

 

याप्रकरणी अटक केलेल्या एकानं या स्फोटामध्ये सहभागी असल्याची त्यानं कबुली दिल्याचा दावा बिहार पोलिसांनी केलाय. यासाठी वापरलेल्या आईडीची पाहणी केली असता, अर्धा किलो स्फोटकांचा वापर झाल्याचं विश्लेषकांनी सांगितलंय. तसंच पाटणा बॉम्बस्फोट आणि बोधगया बॉम्बस्फोटांचा संबंध असल्याचं संशयही एनआयने व्यक्त केला. दोन्ही स्फोटांमध्ये टायमरचा वापर करण्यात आला होता. दोन्ही ठिकाणी स्फोटांच्या वेळी टायमरमध्ये लोटस कंपनीच्या घड्याळांचा वापर करण्यात आला यावरुन एनआयएने संशय व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2013 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close