S M L

राजस्थानमध्ये पुन्हा 'कमळ' उमलणार, काँग्रेस बॅकफूटवर

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2013 11:22 PM IST

राजस्थानमध्ये पुन्हा 'कमळ' उमलणार, काँग्रेस बॅकफूटवर

rajasthan election28 ऑक्टोबर : छत्तीसगड आणि मध्यप्रदेशनंतर राजस्थानमध्येही 'कमळ' उमलणार अशी शक्यता आहे. जर आज निवडणुका झाल्या तर कुणाची सत्ता येईल यासाठी आयबीएन नेटवर्क आणि द वीक यांच्यासाठी CSDS ने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार आज जर निवडणुका झाल्या तर राजस्थानमध्ये भाजपच्या वाट्याला 115 ते 125 जागा मिळतील तिथेच काँग्रेस 60 ते 70 जागांवर फेकली जाईल.

इतर पक्षात बसपाला 4 ते 8 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये थेट लढत ही काँग्रेसविरुद्ध भाजप अशी राहणार असून यात भाजप बाजी मारले हे स्पष्ट होतंय. मतांच्या टक्केवारीत काँग्रेस 2008 साली 36.8 टक्क्यांवर होतं पाच वर्षानंतर आज काँग्रेसची स्थिती 32 टक्क्यांवर आली आहे.

तर भाजपची 2008 साली 34.3 टक्के होती ती आता 41 टक्क्यांवर पोहचली आहे. सत्ताधार्‍यांना पुन्हा संधी द्यावी का असा सवाल केला असता तर 31 टक्के लोकांना होकार दिलाय तर 45 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांना 43 टक्के लोकांनी होकार दिलाय तर अशोक गेहलोत यांना 25 टक्के लोकांनी पसंती दिलीय.

मतांची टक्केवारी

---------------------------------------------------------------------------

पक्ष         2008       ऑक्टो. 2013          मतांमधला फरक

--------------------------------------------------------------------------

काँग्रेस       36.8%          32%                            -5%

भाजप        34.3%         41%                           7%

बसपा           7.6%           7%                              -1%

इतर           21.3%        20%                              -1%

===================================================================

सत्ताधार्‍यांना पुन्हा संधी द्यावी ?

 • हो - 31%
 • नाही - 45%
 • माहीत नाही - 24%

===================================================================

सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात?

 • समाधानी - 50%
 • असमाधानी - 38%
 • माहीत नाही - 12%

===================================================================

मुख्यमंत्री कोण व्हावा ?

 • * वसुंधरा राजे - 43%
 • * अशोक गेहलोत - 25%
 • * सी पी जोशी - 3%
 • * किरोरी लाल मीना - 2%
 • * सचिन पायलट - 2%

===================================================================

मुख्यमंत्र्यांची कामगिरी

--------------------------------------------------------------

                      वसुंधरा राजे                 अशोक गेहलोत

                         (2008)                       (2013)

-------------------------------------------------------------

समाधानी -           70%                           55%

असमाधानी -         22%                          35%

माहीत नाही -          8%                           10%

-------------------------------------------------------------

===================================================================

विभागनिहाय पक्षीय स्थिती

 • उत्तर (39 जागा) भाजप आघाडीवर
 • पश्चिम (43 जागा) भाजपची विभागात लाट
 • मध्य (36 जागा) भाजपची आघाडी
 • मत्स्य (30 जागा) भाजपची आघाडी
 • दक्षिण (35 जागा) काँग्रेसची काठावर आघाडी
 • हरोटी (17 जागा) भाजपची आघाडी

===================================================================

निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे

 • * महागाई - 18%
 • * बेरोजगारी - 9%
 • * विकास आणि सरकार - 9%
 • * भ्रष्टाचार - 8%
 • * पाणीपुरवठा - 5%
 • * वीजपुरवठा - 3%
 • * रस्त्यांची अवस्था - 3%
 • * सत्ता बदल - 2%
 • * यूपीए सरकारची वाईट कामगिरी - 2%
 • * महिलांची सुरक्षा - 2%
 • * शेतकर्‍यांच्या समस्या - 2%
 • * शिक्षण - 2%
 • * इतर विविध विषय - 22%
 • * माहीत नाही - 13%

===================================================================

जागांचा अंदाज

 • एकूण जागा - 200
 • * भाजप - 115 ते 125
 • * काँग्रेस - 60 ते 68
 • * बसप - 4 ते 8
 • * माकपा - 3
 • * जेडीयू - 1
 • * सपा - 1
 • * इतर - 8 ते 12

===================================================================

 असा केला सर्व्हे

 • * सर्व्हेचा कालावधी - 14 ऑक्टो. - 21 ऑक्टो.
 • * सर्व्हेतील मतदारसंघांची संख्या - 49
 • * सर्व्हेतील मतदान केंद्रांची संख्या - 196
 • * सर्व्हेत अपेक्षित मतदारांचा सहभाग - 4900
 • * सर्व्हेत प्रत्यक्ष मतदारांचा सहभाग - 4427

 ===================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2013 11:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close