S M L

राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले -पटेल

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2013 03:49 PM IST

Image praful_patel_pti_sot_300x255.jpg30 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यावर काही तोडगा निघत नसल्यामुळे राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले आहेत, असं राष्ट्रवादीचे नेत प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय.

 

राष्ट्रवादी आज धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पक्ष वाढवण्याचा सर्वांना हक्क आहे. समविचारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. भाजप आणि काँग्रेसविरोधी राजकीय पक्षांची आज दिल्लीत बैठक होतेय. आणि काँग्रेसचा महत्त्वाचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने त्यात सहभागी होण्याचं जाहीर करत धक्का दिलाय.

 

डावे, समाजवादी पक्ष आणि संयुक्त जनता दलानं ही बैठक बोलावलीय. वायएसआर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षानं बैठकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्या निवडणुकात काहीही होऊ शकते. उद्या तिसरी आघाडी सत्तेवर आली तर ते देशासाठी चांगलंच राहिलं या आघाडीचं आपण स्वागत करतो. एखाद्यावेळेस सत्ताधार्‍यांनाच तिसर्‍या आघाडीला पाठिंबा द्यावा लागेल असे सुचक वक्तव्य पवारांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2013 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close