S M L

पटेलांच्या धर्मनिरपेक्षतेची देशाला गरज -नरेंद्र मोदी

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2013 02:31 PM IST

modi in bhopal3331 ऑक्टोबर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या निमित्तानं त्यांचा वैचारिक वारसा कुणाकडे यावरुन राजकीय नाट्य चांगलच रंगलंय. निमित्त होतं सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमाचं.

सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या भूमिपुजनावेळी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दयाला हात घातला. देशाला सरदार पटेलांच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारांची गरज आहे असं प्रतिपादन मोदी यांनी केलं. तसंच पटेल हे केवळ एका पक्षाचे नाही तर देशाचे नेते होते असंही मोदी यांनी म्हटलं.

तसंच यावेळी त्यांना काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत असल्याचाही आरोप केला. राजकारणातली अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे असं आवाहनही मोदी यांनी केलं. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेदेखील उपस्थित होते. स्वातंत्र चळवळीचं श्रेय फक्त काँग्रेस लाटू शकत नाही असं मत अडवाणींनी व्यक्त केलं.

दरम्यान, मोदींचा हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गुजरात पोलिसांनी सरदार सरोवराच्या जवळच्या परिसरातल्या आदिवासींचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. सरदार सरोवर धरण परिसरातल्या 66 गावांमधील आदिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रस्तावित स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यावरणाचा विकास करण्याच्या दृष्टीने जमिनी संपादित करण्यात येणार आहेत, त्याच्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पण आपल्या भाषणात मात्र नरेंद्र मोदींनी या आदिवसींची समस्यांकडे लक्ष दिलं जाईल, असं आश्वासन दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2013 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close