S M L

पाटणा स्फोट :NIAच्या तावडीतून संशयित पळाला

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2013 06:30 PM IST

patna blast31 ऑक्टोबर : बिहारची राजधानी पाटणा साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला महत्त्वाचा संशयित मेहरे आलम याने बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढलाय. मेहरे आलम बिहार पोलिसांच्या ताब्यात होता.

त्याला दोन दिवसांपूर्वी दरभंगातून अटक करण्यात आली होती. बुधवारी रात्री मुझफ्फरनगर रेल्वे स्टेशनजवळ एका लॉजवर थांबले होते. त्यावेळी त्याने बाथरूममध्ये जाण्याच्या बहाण्यानं आलमने पळ काढलाय. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एनआयएची टीम आलमची चौकशी करत होती त्याची कस्टडी ही बिहार पोलिसांकडे होती.

पाटणा स्फोटात मुख्य संशियत इम्तियाजला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याच्या चौकशीतून त्याने मेहरे आलमच नाव घेतलं होतं. या माहितीवरुन आलमला ताब्यात घेण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2013 06:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close