S M L

पाटणा स्फोटातील संशयिताचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2013 05:12 PM IST

पाटणा स्फोटातील संशयिताचा मृत्यू

patna blast new 3401 नोव्हेंबर : पाटणा साखळी बॉम्बस्फोटातल्या एका जखमी संशयित आरोपीचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता 7 वर गेलीय.

पाटणा स्फोटाचा तपास सुरू आहे पण एनआयए आणि बिहार पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब म्हणजे या स्फोटातला एक संशयित आरोपी मेहर आलम कालच्या चौकशीदरम्यान पळून गेलाय. स्फोटातला प्रमुख संशयित आरोपी हैदरचा ठाव ठिकाणा आपल्याला माहीत आहे असा दावा मेहर आलमने केला होता.

पण हैदरचा तपास लागण्याआधीच हा आलम मुजफ्फरपूरच्या हॉटेलमधून पळून गेला. याच हॉटेलमध्ये एनआयएची टीमही थांबली होती. एनआयएनं मात्र आलम हा स्फोटाचा साक्षीदार आहे, संशयित नाही, असा दावा केलाय. या प्रकरणी आता एफआयआर नोंदवण्यात आलाय. आता आलम आणि मुख्य संशयित तेहसीन अख्तर यांचा तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2013 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close