S M L

मोदी खोटारडे, सिब्बलांचे टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2013 06:25 PM IST

मोदी खोटारडे, सिब्बलांचे टीकास्त्र

kapil sibbal01 नोव्हेंबर : लोकसभेच्या निवडणुकीचं रण आता तापू लागलंय. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय.

यांना इतिहासाचं ज्ञान नाही आणि एक तर खूपच मोठं खोटं ते बोललेत. ते एकदा म्हणाले चीन आपल्या जीडीपीच्या 20 टक्के शिक्षणावर खर्च करतो.आणि आपण फक्त 4 टक्के पण वस्तुस्थिती ही आहे की, चीनसुद्धा आपल्या शिक्षणावर चारच टक्के खर्च करतो. याबद्दल त्यांनी अजून माफी मागितली नाही. मोदी हे सतत खोट बोलून देशाची दिशाभूल करतात, अशा आरोप त्यांनी आकड्यांनीशी केला.

तसंच काळ्या पैशांविरोधात बोलणार्‍या भाजपने मोदींच्या भव्य सभांसाठी पैसा कुठून येतो, याचा हिशेब द्यावा, असंही आव्हान दिलंय. दरम्यान, राहुल गांधी यांना मोदींसमोर उभं करण्याची हिम्मत काँग्रेसमध्ये नाही, म्हणूनच सिब्बल अशी आव्हानं देत आहेत, असा पलटवार भाजपनं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 1, 2013 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close