S M L

नार्कोटिक्स स्मगलिंगसाठी कुरिअर सेवेचा वापर

7 फेब्रुवारी मुंबईअंमली पदार्थांची स्मगलिंग करणारे आता स्मगलिंगसाठी कोणती पद्धत वापरतील याचा नेम नाही. नार्कोटिक्स परदेशात पाठवण्यासाठी आता स्मगलर्संनी नवा मार्ग अवलंबला आहे. याबाबत माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अंमलीपदार्थचा व्यवसाय करणा-या विरोधात पोलिसांची मोठी मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी नार्कोटिक्स स्मगलर लॅम्बर्ट झोन्सा याला अटक केली . लॅम्बर्ट झोन्सा वय वर्षे 28. लॅम्बर्ट गेल्या सहा महिन्यापासून भारतात आहे. बेकार असलेला लॅम्बर्ट नार्कोटिक्सचा धंदा करण्यासाठी भारतात आला. यापूर्वी विविध मार्गांनी हेरॉईन भारतात यायचं. पण आता लॅम्बर्ट आणि त्याच्या साथीदारांनी सुरक्षित मार्ग शोधला. ते कुरिअरने हेरॉईन पाठवत होते.पण या मार्गाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत ताजने यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक दाभाडे आणि दिपक चव्हाण यांनी आपल्या पथकाच्या सहाय्याने या स्मगलिंगवर कारवाई केली.ना.म.जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक दाभाडे सांगतात, कुरियरनं हेरॉईन परदेशात पाठवण्यासाठी या स्मगलर्संनी शक्कल लढवली होती. परदेशात गाड्यांचे काही पार्ट पाठवले जातात. या पार्टसच्या कव्हरमधून हेरॉईन पाठवण्याची त्यांनी तयारी केली होती. कव्हर असं फाडायचं. त्यात छोट्याछोट्या प्लास्टिकच्या पिशवीत हेरॉइन ठेवायचंआणि ते पाठवायचं. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण सांगतात, हे हेरॉईन ओळखता येऊ नये तसंच विमानतळावर स्कॅनरमध्ये सापडू नये म्हणून त्यावर कार्बन पेपर लावला जात होता.एटीएसने काही दिवसांपूर्वी 15 किलो हेरॉईन पकडंल होतं. आता एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका वेळी हजारो लोकांना पुरेल एवढं हे हेरॉईन आहे. एका बाजूला सर्वत्र मंदी असल्याचं म्हटलं जातं. पण सर्व कारवाई पाहिल्यानंतर हेरॉईनचा बाजार तेजीत असल्याचं दिसून येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2009 05:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2009 05:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close