S M L

नक्षलवाद्यांना उत्तर, छत्तीसगडमध्ये 67 टक्के मतदान

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2013 10:35 PM IST

नक्षलवाद्यांना उत्तर, छत्तीसगडमध्ये 67 टक्के मतदान

chatisgad election411 नोव्हेंबर : एकीकडे दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रंगत वाढतेय. तर नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान झालं. मतदारांनी नक्षलवाद्याला चांगलंच उत्तर दिलंय. नक्षलवादाच्या सावटाखाली हे मतदान झालं असलं तरी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात तब्बल 67 टक्के मतदान झालं.

पण, सुकमामध्ये 42 मतदान केंद्रांवर मतदार फिरकलेच नाही. राजनांदगावमधून मुख्यमंत्री रमण सिंह यांचं भवितव्यही एव्हीएम मशीनमध्ये कैद झालं. दरम्यान, दंतेवाडातल्या नायनार पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली.

यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झालाय. तर चकमकीत 5 ते 6 नक्षलवादी ठार झाल्याचीही माहिती आहे. नक्षलप्रभावित बस्तर आणि राजनंदगाव इथं आज मतदान झालं. 3 वाजेपर्यंत या ठिकाणी 70 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2013 10:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close