S M L

राष्ट्रपतींच्या ताफ्यातल्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला

9 फेब्रुवारी मुंबईमुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर, उड्डाण घेणा-या विमानासमोर अचानक आल्यानं पायलटनं उड्डाण थांबवलं. इंडियन कंपनीचं मुंबई - दिल्ली विमान उड्डाण करत असताना, लष्कराचं हेलिकॉप्टर अचानक समोर आलं. मात्र सुदैवानं हा अपघात टळला. या विमानात दीडशे प्रवासी होते. टेक ऑफ करण्यापूर्वीच विमान पायलटनं जोरदार ब्रेक्स लावल्यामुळे मोठा अपघात टाळला.दरम्यान मुंबई विमानतळावरील घटनाप्रकरणाची राष्ट्रपती कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आलीये. राष्ट्रपती निवासातील अधिका-यांनी नागरी विमान उड्डाण मंत्रालय आणि संरक्षण विभागाला पत्र लिहलंय या पत्रात मुंबई विमानतळावर झालेल्या आणि विमान पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळलेल्या दुर्घटनेच्या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. या दोन विभागाच्या मंत्र्याना या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता नियम 77 अंतर्गत मुंबई विमानतळ घटनेची चौकशी सुरू झाली आहे. सिव्हील एव्हिएशनचे डायरेक्टर जनरल ए. के.चोप्रा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.या घटनेच्यावेळी मुंबई एटीसी यंत्रणा सतर्क होते. त्यांनीच हेलिकॉप्टरच्या पायलटला इमर्जन्सी ब्रेक लावायच्या सूचना दिल्या होत्या, असं चोप्रा यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2009 05:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2009 05:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close