S M L

दिल्लीत माझ्या विरोधात कारस्थान रचणारी टोळी- मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Nov 18, 2013 04:37 PM IST

Image img_218002_modionsoniya4_240x180_300x255.jpg18 नोव्हेंबर : ज्या घराण्याने देशाला उध्वस्त केलं, त्याला विरोध करण्याचा मला अधिकार आहे, पण दिल्लीत माझ्या विरोधातली टोळी कारस्थाने करत आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला.

 

तसंच आम्ही काँग्रेसची झोप चोरणारे चोर आहोत, आणि काँग्रेसच्या एका परिवाराला मी आव्हान देतोय असंही मोदी म्हणाले. मध्यप्रदेशामधील छत्तरपूर येथे मोदी यांची आज प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीकास्त्र सोडले. दिल्ली सरकारने मध्यप्रदेशासाठी काय केल असा सवाल विचारत, काँग्रेस फक्त वोटबँकच्या राजकारणात अडकली आहे. जनतेला भडकावून देण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी विकासाच्या मुद्यावर माझ्याशी चर्चा करावी असं थेट आव्हान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांना दिलं.

 

काँग्रेसने मध्यप्रदेशला खड्‌ड्यात टाकले होते. हे खड्डे भरता भरता भाजपला 20 वर्ष लागली असे सांगत मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे नेते तर खोट बोलण्याची फॅक्टरीच असल्याची टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2013 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close