S M L

'हेलेन' आंध्रच्या किनार्‍यावर कुठल्याही क्षणी धडकणार

Sachin Salve | Updated On: Nov 22, 2013 10:05 PM IST

Cyclone-phaili22 नोव्हेंबर : फायलीन चक्रीवादळातून सावरलेल्या आंध्रला आज हेलेन चक्रीवादळचा तडाखा बसणार आहे हेलेन चक्रीवादळ वेगानं आंध्रच्या दिशेनं सरकतंय.

सध्या या वादळाचा वेग ताशी 110 किलोमीटर इतका जास्त आहे. शुक्रवारी संध्याकाळी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कृष्णा जिल्ह्यातल्या मछलिपट्टणम या ठिकाणी धडकेल. त्यापूर्वी आलेल्या जोरदार वार्‍यांमुळे विशाखापट्टणम आणि इतर शहरांमध्ये जोरदार पाऊस पडतोय.

या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आंध्र प्रदेश आणि केंद्र सरकार जय्यत तयारीमध्ये आहे. एनडीआरएफची पथकं आधीच राज्यामध्ये तैनात करण्यात आलीत. गुंटुर, वेस्ट गोदावरी आणि इस्ट गोदावरी या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची भीती आहे.

खबरदारी म्हणून उत्तर तामिळनाडूमधल्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे अर्थात एनडीआरएफची पथकं दोन्ही राज्यांकडे आधीच तैनात करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2013 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close