S M L

एअर ट्रॅफिक कंट्रोलचा गलथान कारभार उघडकीस

11 फेब्रुवारी मुंबईमुंबईत एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या बेजबाबदारपणाचा एक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी मुंबई विमानतळावर जो अपघात टळला. त्याच्या काही मिनिटं आधी राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टर्सचा ताफा कुलाबा तळावर निघाला. पण त्याच्या आधी महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या हेलिपॅडवरून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हेलिकॉप्टरलाही उडण्याची परवानगी देण्यात आली. पण एकाच मिनिटात हेलिकॉप्टर उतरवण्यास सांगण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. राष्ट्रपतींचा ताफा जात असल्याचं सांगत हे हेलिकॉप्टर उतरवण्यास सांगण्यात आलं. सोमवारी मुंबई एअरपोर्टवर राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर आणि आसीसी-866 विमानांमधला मोठा अपघात टळला. विमानाचा पायलट सतर्क असल्यामुळे जवळपास दीडशे प्रवासी बचावले. दरम्यान, डायरेक्टोरेट जनरल सिव्हिल एव्हिएशननं एटीसीच्या संबंधित दोन्ही अधिका-यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सुट्टीवर पाठवण्यात आलंय. आयसीसी-866 विमानाचे कॅप्टन कोहली आणि कॅप्टन दिवाण यांची चौकशी पूर्ण झाली आहे. आणि या दोघांनाही कामावर त्वरीत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2009 05:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2009 05:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close