S M L

तेजपालकडून पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव?

Sachin Salve | Updated On: Nov 23, 2013 10:33 PM IST

tarun tejpal23 नोव्हेंबर : 'तहलका' लैंगिक अत्याचार प्रकरण आता आणखी चिघळत चाललंय. तरुण तेजपालकडून माझ्या कुटुंबावर दबाव टाकला जातोय असा आरोप पीडित मुलीनं केलाय.

हा दबाव वाढत जाण्याची भीती आहे असंही या मुलीनं आपल्या निवेदनात म्हटलंय. तेजपाल परिवाराचा सदस्य शुक्रवारी माझ्या आईच्या घरी आला आणि मी कायदेशीर मदत कुणाकडून घेतेय.

तेजपाल याच्याविरोधातल्या तक्रारीच्या बदल्यात मला काय हवंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असं या मुलीचं म्हणणं आहे. यामुळे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रचंड दबाव आलेला आहे आणि मी अत्यंत वाईट मनस्थितीत आहे असं या पीडित मुलीचं म्हणणं आहे.

शोमा चौधरी यांची चौकशी

दरम्यान, गोवा पोलिसांनी तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांची चौकशी केली. या संबंधात सर्व कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द केल्याचं तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांनी सांगितलंय.दरम्यान लिफ्टमध्ये CCTV नसल्याचं गोवा पोलिसांचं म्हणणं आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे नाही

तर ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली तिथल्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचं गोवा पोलिसांचं म्हणणं आहे. पीडित तरुणीनं पोलिसांकडे अजून तक्रार केलेली नाहीय. पण पीडित तरुणी आता पोलिसांना जबाब द्यायला तयार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तेजपाल आणि शोमा यांची चौकशी केल्यानंतर पोलीस तरुणीचा जबाब नोंदण्याची शक्यता आहे. तेजपालना अटक करण्याची शक्यताही पोलिसांनी फेटाळलेली नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2013 10:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close