S M L

'तहलका' प्रकरण: पीडित महिलेचा राजीनामा

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2013 04:22 PM IST

TARUN_TEJPAL_1660121f25 नोव्हेंबर : तहलकाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित महिला पत्रकाराने राजीनामा दिला आहे. आता तहलकामध्ये काम करण अशक्य असल्याचं सांगत या पीडित तरुणीने हा राजीनामा दिल्याचे समजते.

तर दुसरीकडे, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला तहलकाचा संस्थापक - संपादक तरुण तेजपाल याने दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामीन मागितला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

आज सोमवारी गोवा पोलीस मुंबईमध्ये पीडित तरुणीच्या चौकशीसाठी येत आहेत. तेजपालवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणारी महिला पत्रकार ही मुंबईची असून गोवा पोलीस आज तिचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी पोलीस तेजपालला बोलावण्याची शक्यता आहे. पीडित तरुणीचा जबाब नोंदवल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता गोवा पोलीस पत्रकार परिषद घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2013 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close