S M L

मोदींच्या खुर्चीची लागली बोली !

Samruddha Bhambure | Updated On: Nov 27, 2013 01:26 PM IST

मोदींच्या खुर्चीची लागली बोली !

27 नोव्हेंबर :  नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पण यावेळी त्यांच्यासोबत चर्चेत आहे त्यांची खुर्ची. मोदी यांच्या लोकप्रियतेचा हा आणखीन एक नमुना. 21 नोव्हेंबरला आग्रा झालेल्या रॅली दरम्यान मोदी ज्या खुर्ची विराजमान होते त्या खुर्चीची किंमत 24तासात सव्वा लाखांपर्यंत पोहोचली आहे.

हि खुर्ची विकत घेण्यासाठी आग्रातल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता ही चढाओढ सुरू झालीय. विशेष म्हणजे मोदीआसन विकत घेण्यासाठी एका सामान्य नागरिकाने 50 हजार रुपये मोजायची तयारी दाखवली आहे.

या सगळ्यावर कडी म्हणजे ही खुर्ची आहे या कार्यक्रमासाठी मंडप उभारणार्‍या कॉन्ट्रॅक्टर प्रमोद उपाध्यायची आणि तो यापैकी कुणालाही ही खुर्ची विकायला तयार नाहीये, त्यावर त्याला खुर्चीची एक झलक दाखवाची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे त्याने ही खुर्ची आता 'दर्शना'साठी बाहेर ठेऊन दिली आहे. आता पर्यंत या खुर्चीची त्याला 3 लाखाची ऑफर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2013 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close