S M L

'तहलका'च्या शोमा चौधरींचा राजीनामा

Samruddha Bhambure | Updated On: Nov 28, 2013 02:16 PM IST

'तहलका'च्या शोमा चौधरींचा राजीनामा

tarn-shoma 28 नोव्हेंबर : तहलका लैंगिक शौषण प्रकरणी राजीनामा सत्र सुरूच आहे. तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.घडलेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांचंही नाव एफआरआयमध्ये टाकलं जाण्याची शक्यता आहे. पण, शोमा यांनी सर्व आरोप खोटे असल्याचे सांगते.

लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर तहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांनी 8 दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शोमा चौधरी या संपादक म्हणून काम पाहत होत्या मात्र पीडित मुलीने तक्रार करूनही शोमा चौधरी यांनी त्यावर कारवाई करण्यास उशीर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात शोमा चौधरी तरूण तेजपाल यांना पाठीशी घालतायेत, असा आरोपही करण्यात येत आहे.

शोमा चौधरी यांच्या राजीनाम्यामुळे या प्रकरणात तहलकामध्ये राजीनामा दिलेल्यांची संख्या आता 7 झाली आहे.

शोमा चौधरींचा राजीनामा

"तहलकाशी निगडीत सगळ्यांसाठीच हा कठीण काळ आहे. घटना कळल्याबरोबरच चीड येऊन आणि सोबतच एक स्त्री म्हणून मी तातडीने पावलं उचलली, पण त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. अर्धवट आणि निवडक माहिती लीक करून मीडियाने हे प्रकरण मोठं केलं. सारवासारव करत असल्याच्या आरोपाचा मला मान्य नाही. माझ्याच क्षेत्रातल्या लोकांनी आणि इतर लोकांनी माझ्या हेतूंबाबत वारंवार शंका घेतली. माझ्या इथे असण्याने तहलकाला मदत होतेय का तहलकाचं नुकसान होतंय हे मला कळत नाही. पण तहलकाची प्रमुख म्हणून काम करताना मी कुठे कमी पडले असेन किंवा माझं मत स्पष्ट करू शकले नसेन तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2013 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close