S M L

तेजपालला सहा दिवसांची पोलीस कोठडी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 2, 2013 09:00 AM IST

तेजपालला सहा दिवसांची पोलीस कोठडी

tejpalarrest1 डिसेंबर : लैंगिक शोषण प्रकरणी 'तहलका'चा माजी संपादक तरुण तेजपालला आज रविवार पणजी सत्र न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

 

ही केस संवेदनशील आहे आणि त्यामुळे तेजपालची कोठडी आवश्यक आहे असं गोवा पेलिसांनी कोर्टानं सांगितलं. शनिवारी तेजपालच्या जामीन अर्जावर गोव्यातल्या सेशन्स कोर्टात सुनावणी झाली. पण न्यायाधिशांनी आपला निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी तेजपालची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्याला तेजपालच्या वकिलांनी विरोध केला. तेजपाल तपासात सहकार्य करत असल्यानं पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.

 

लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालला अटक होणार की जामीन मिळणार यावरुन अखेर पडदा उठला आहे. कोर्टाने तरुण तेजपाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे तेजपालला गोवा पोलिसांना ताब्यात घेतलं  होत.

 

रात्री 8 वाजताच्या सुमारास कोर्टाने हा निकाल दिला. आधी आम्ही कोर्टाची ऑर्डर वाचू आणि त्यानंतर तेजपालला अटक करू अशी भूमिका गोवा पोलिसांनी घेतली होती त्यामुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या काळात तेजपाल क्राईम ब्रँचच्या ताब्यात होता. अखेरीस पोलिसांनी तेजपालला अटक केली. रात्रीच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी त्याला खूनाचा आरोप असलेल्या गुन्हेगारांबरोबर रात्री घालवावी लागली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2013 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close