S M L

केजरीवाल यांनी मैदान मारले, 22 हजार मतांनी विजयी

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2013 08:35 PM IST

केजरीवाल यांनी मैदान मारले, 22 हजार मतांनी विजयी

arvind kejriwal win08 डिसेंबर : जनलोकपाल आंदोलनातून आपला पक्ष स्थापन करुन राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले अरविंद केजरीवाल यांनी भरघोस मतांने विजय होतं मैदान मारले आहे. पहिल्याच निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा 22 हजार मतांनी दणदणीत विजय झालाय.

केजरीवाल यांनी गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्रीपद भुषवणार्‍या शीला दीक्षित यांचा दारुण पराभव केलाय. तर भाजपकडून विजेंद्र गुप्ता उभे राहिले होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून केजरीवाल यांनी आघाडी घेतली आणि ती अखेर विजयातच बदलली. शीला दीक्षित 8 हजार मतांनी पिछाडीवर असतांना राजीनामा दिलाय.

केजरीवाल यांनी दीक्षित यांच्या विरोधात उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता तेंव्हा राजकीय विश्लेषकांनी हा प्रकार म्हणजे पायावर दगड मारुन घेण्यासारखा आहे अशी टीका केली होती. मात्र केजरीवाल यांनी 22 हजार मतांनी विजयी होऊन राजकीय विश्लेषकांची बोलती बंद केलीय. केजरीवाल यांच्या विजयासह आम आदमी पार्टीने दिल्लीच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची नोंद केलीय.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सोबत जनलोकपाल आंदोलनातून केजरीवाल जनते समोर आले. त्यानंतर आंदोलनातून बाहेर पडून केजरीवाल यांनी आपला पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापनेनंतर केजरीवाल यांचा पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं गेला आणि दमदार विजयी पदार्पण ही केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2013 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close