S M L

'भाजप आणि 'आप'ने एकत्र यावे'- किरण बेदी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 9, 2013 02:56 PM IST

Image kiran_bedia_300x255.jpg09  डिसेंबर : 'भाजप आणि 'आप'ने एकत्र यावे' असे आवाहन माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी केले आहे. दिल्लीच्या जनतेने भाजप आणि 'आप'च्या बाजूने मते देऊन आपली कामगिरी चोख निभावली, पण दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हा प्रश्न आजूनही सुटलेला नाही.

दिल्लीच्या जनतेच्या हितासाठी या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे व यासंदर्भात दोन्ही पक्षातल्या ज्येष्ठांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असेही किरण बेदी यांनी म्हटलं आहे. पण आम आदमी पार्टीने किरण बेदींचा हा प्रस्ताव फेटाळून लावला असून भाजपनेही 'आप'ला समर्थन देण्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2013 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close