S M L

दिल्लीत सरकार कुणाचे ?

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2013 03:33 PM IST

दिल्लीत सरकार कुणाचे ?

delhi kejriwal and harshvardhan09 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा 'सफाया' झालाय पण दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार यावरुन घोळ सुरु झालाय. भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकूनही बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे दिल्लीत पुन्हा निवडणुका होणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

कारण आपल्याकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेशा जागा नाही, उमेदवारांसाठी घोडेबाजार करणार नाही असं भाजपने केलंय. तर आपण विरोधी पक्षात बसणं पसंत करू आणि पुन्हा निवडणुकांसाठी तयार असल्याचं आम आदमी पार्टीने स्पष्ट केलं आहे.

दिल्लीमध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपला 3 जागा कमी पडत आहे. त्यामुळे भाजपला एकतर अल्पमतातलं सरकार बनवावं लागेल किंवा विधानसभा काही काळापुरती बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पर्यायही आहे.  या निवडणुकीत आम आदमी धडाकेबाज पदार्पण करत 28 जागा पटकावल्या आहे.

जर भाजप अथवा काँग्रेसला पाठिंबा द्यायचा ठरला तर हा पक्षाच्या अजेंड्याच्या विरोधात आहे. आणि आम्ही तसं काहीही करणार नाही. त्यापेक्षा पुन्हा निवडणुका घ्याव्यात असं स्पष्ट मत अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.दरम्यान, यापुढे सत्तेच्या राजकारणात कोणती भूमिका घ्यायची याबाबत आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची दुपारी 3 वाजता आणि 6 वाजता बैठक होणार आहे.

=====================================================================

दिल्ली विधानसभेचा निकाल एकूण 70 जागा

  1. भाजप - 32
  2. आम आदमी पार्टी -28
  3. काँग्रेस - 8
  4. इतर - 2

(एकूण 70 जागा, बहुमतासाठी हव्यात 36 जागा)

=====================================================================

भाजपपुढे पर्याय

=====================================================================

दिल्लीत सरकार कोणाचं येणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीत आहे. दिल्लीत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष भाजप असला तरी त्यांना बहुमत नाही. मग दिल्लीत कोणते पर्याय उरतात. त्यावर एक नजर टाकूया...

- सध्याच्या विधानसभेची मुदत 18 डिसेंबरला संपत असल्यामुळे त्याआधी नव्या विधानसभेचं अधिवेशन सुरु होणं गरजेचं आहे

- लेफ्टनंट जनरल नजीब जुंग सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करु शकतात

- भाजपला बहुमत सिद्ध करणं जमलं नाही तर त्यांच्यासमोर दोन पर्याय आहेत

1. आघाडी सरकार स्थापन करणे

2. बाहेरुन पाठिंबा मिळवणे

3. पाठिंबा पत्राशिवाय भाजप आपलं बहुमत आजमावू शकतं.

 

- भाजप अल्पमतातलं सरकारही चालवू शकतं पण त्यासाठी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विरोधकांमधली काही मतं गैरहजर रहाण्याची 'काळजी 'त्यांना घ्यावी लागेल.

- जर या सगळ्या शक्यता फोल ठरल्या तर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट येत्या सहा महिन्यांसाठी लागू होऊ शकते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2013 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close