S M L

केजरीवाल घेणार अण्णांची भेट,उपोषणाला दिला पाठिंबा

Sachin Salve | Updated On: Dec 11, 2013 10:46 PM IST

केजरीवाल घेणार अण्णांची भेट,उपोषणाला दिला पाठिंबा

kejriwal and anna11 डिसेंबर : अण्णांचा 'हनुमान' म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे अरविंद केजरीवाल आता आम आदमीचे नेते झाले आहे. 'आप'च्या वतीने केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या उपोषणाला अपेक्षेप्रमाणे पाठिंबा दिलाय. पण आम्ही अण्णांच्या सोबत होतो आणि राहणार असं सांगत केजरीवाल यांनी पाठिंबा दिलाय. उद्या गुरुवारी केजरीवाल राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांची भेट घेणार आहे. आपण आता एका राजकीय पक्षाचे नेते आहोत त्यामुळे अण्णांच्या म्हणण्यानुसार लोकांमध्ये सहभागी होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दुसर्‍या दिवशी अण्णांचे माजी सहकारी आंदोलनात परतायला लागले आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी बुधवारी सकाळी राळेगणमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली आणि शनिवारपासून अण्णांसोबत उपोषणाला बसणार असल्याचंही जाहीर केलं.

तर दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवलं. पण ज्या आंदोलनातून केजरीवालांचा पक्ष उभा राहिला तोच अण्णांच्या आंदोलनापासून दूर असल्याची कुजबूज सुरू झाली होती. पण बुधवारी संध्याकाळी दिल्लीत 'आप'च्या यशाबद्दल भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केजरीवाल यांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. अण्णांच्या आंदोलनापासून आम्ही वेगळे झालो नाहीत. आजही आम्ही अण्णांच्या सोबतच आहोत असं सांगत केजरीवाल यांनी गुरूवारी सकाळी अण्णांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.

विशेष म्हणजे अण्णांनी उपोषणांची घोषणा केली तेंव्हा राजकीय पक्षांना उपोषणाच्या व्यासपीठावर जागा नाही असं स्पष्ट केलं होतं. अण्णांचा आदेश पाळत केजरीवाल यांनीही उपोषणाच्या व्यासपीठावर बसणार नसून लोकांमध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं. लोकपालसाठी केजरीवाल अण्णांच्या खांद्याला खांदा देऊन लढले होते आता उद्या केजरीवाल पक्षाचा झेंडा खाली ठेवून उपोषणात सहभागी होतात का हे पाहण्याचं ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2013 10:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close