S M L

केजरीवाल यांनी मागितले काँग्रेस, भाजपकडून स्पष्टीकरण

Sachin Salve | Updated On: Dec 14, 2013 08:28 PM IST

delhi kejriwal and harshvardhan14 डिसेंबर : दिल्लीत सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणार्‍या काँग्रेस आणि भाजपला जाहीरनाम्याबाबत 'आपला इरादा काय' आहे असं स्पष्टीकरण केजरीवाल यांनी विचारलं आहे.

केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहिलंय आणि या पत्राची एक प्रत त्यांनी नायब राज्यपालांनाही दिली आहे. काँग्रेस आणि भाजपनं आपच्या जाहीरनाम्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन केजरीवाल यांनी या पत्राद्वारे केलंय.

नायब राज्यपालांच्या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी केजरीवाल यांनी 10 दिवसांची मुदत मागितली आहे. यातले 7 दिवस केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपला पत्राला उत्तर देण्यासाठी दिलेत. तर पुढच्या तीन दिवसांच्या अवधीत केजरीवाल राज्यपालांना आम आदमी पार्टीतर्फे उत्तर देणार आहे. तर दुसरीकडे भाजपनं आपण विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची ठाम भूमिका घेतलीय, तर काँग्रेसनं पाठिंबा देत आता निर्णय आपचा असल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2013 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close