S M L

लोकपाल विधेयकाला केजरीवाल यांचा विरोध कायम

Samruddha Bhambure | Updated On: Dec 15, 2013 09:52 PM IST

kejrival ink15 डिसेंबर : लोकपाल विधेयकावरून वाद सुरूच असून आम आदमी पार्टीने सरकारी लोकपाल विधेयकाला असलेला विरोध पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. आज रविवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे नेते अऱविंद केजरीवाल यांनी विरोध दर्शवला.

"चौकशी करणार्‍या संस्था जर सरकारच्या नियंत्रणाखाली राहणार असतील तर अशा विधेयकाला कोणताही अर्थ नाही", अशी टीका आम आदमी पार्टीचे नेते अऱविंद केजरीवाल यांनी केली आहे.

 

थेट पंतप्रधानांवर निशाणा साधत "सीबीआयला स्वायत्त केल्यास कदाचित पंतप्रधानांनासुद्धा 2जी किंवा कोळसा घोटाळ्यात आत जावे लागेल", अशी टीका आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली.

 

दरम्यान, अण्णांनी सरकारी लोकपालला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी लोकपालच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी घेतलेली पत्रकार परिषद या लोकपालच्या मुद्द्यावर श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याची टीका केजरीवाल यांनी या वेळेस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2013 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close