S M L

विश्व साहित्य संमेलनाचा सॅन होजेत समारोप

17 फेब्रुवारीअमेरिकेत सॅन होजे इथल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. संमेलनाच्या उदघाटनापासूनच या संमेलनाची रंगत वाढत गेली आणि त्याचा कळस झाला. सुरुवातीला वादामुळे गाजलेलं हे संमेलन नंतर मात्र वाखाणलं गेलं ते संमेलनाच्या नेटक्या आयोजनामुळे आणि अमेरिकेतल्या मराठी माणसांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे. मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच विश्व मराठी साहित्य संमेलनालाही अनुदान देण्याचा राज्यसरकारचा विचार असल्याचं संकेत सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले. संमेलनाच्या समारोपासाठी हर्षवर्धन पाटील सॅन होजेत आले होते. राज्याच्या संास्कृतिक धोरणात परदेशातील मराठी व्यक्तींनाही सामावून घेणार अशी घोषणाही हर्षवर्धन पाटील यांनी केली. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप झाला. या संमेलनाला केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर अमेरिकेतल्या मराठी माणसांनी चांगला प्रतिसाद दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2009 04:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2009 04:04 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close