S M L

सत्तेसाठी 'आप' घेणार दिल्लीकरांचे जनमत

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2013 07:54 PM IST

arvinda kejriwal17 डिसेंबर : दिल्लीत सरकार स्थापनेच्या निर्णयावर आम आदमी पार्टीने जनमत चाचणी घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीकरांना मोबाईद्वारे, एसएमएसकरुन तसंत आपच्या वेबसाईटवरुनही आपली मतं नोंदवता येणार आहेत. यानंतर सोमवारी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचंही केजरीवाल यांनी म्हटलंय.

 70 जागांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने 28 जागा जिंकल्यात तर भाजपाला 32 आणि काँग्रेसला 8 जागा मिळाल्यात. भाजपला सत्ता स्थापनसाठी 4 जागा कमी पडत असून विरोधी पक्षात बसण्याची भाजपने ठाम भूमिका घेतलीय. तर काँग्रेसनं 'आप'ला बिनशर्त पाठिंबा दिलाय.

पण हा पाठिंबा स्विकारावा का आणि दिल्लीत सत्ता स्थापन करावी का यासाठी आम आदमी पार्टीनं जनतेचं मत मागवलंय. 'आप'नं यासंबंधी एक पत्र लिहिलं असून त्याच्या 25 लाख प्रती जनतेमध्ये वाटल्या जाणार आहेत आणि रविवारपर्यंत लोकांची मतं मागवली जाणार असल्याचं आपच्या अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2013 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close