S M L

कॅप्टन सुनील जेम्सचं मायदेशी आगमन

Samruddha Bhambure | Updated On: Dec 20, 2013 08:44 PM IST

कॅप्टन सुनील जेम्सचं मायदेशी आगमन

1387450246_captain sunil james20 डिसेंबर :कॅप्टन सुनील जेम्स यांचं आज मायदेशी आगमन झालं. आज दुपारी मुंबईमध्ये एअरपोर्टवर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं स्वागत केलं. समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपावरून कॅप्टन जेम्स हे गेल्या सहा महिन्यांपासून टोगोच्या तुरुंगात होते. काल गुरूवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली असून आज शुक्रवारी मायनगरी मुंबईत परत आले आहेत.

सुनील जेम्स अटकेत असताना त्यांच्या 11 महिन्याच्या मुलाचा 2 डिसेंबरला निधन झाले आणि त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी सुनीलला येता यावं यासाठी त्यांची पत्नी अदिती जेम्सने मोठा संघर्ष केला होता. जो पर्यंत सुनील यांची सुटका होणार नाही तोपर्यंत त्यांच्या मुलावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबीयांनी घेतला होता. अखेर भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलत टोगो सरकारवर दबाव वाढवला आणि सुनील जेम्स यांची अखेर सुटका करण्यात यश आले. या संदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2013 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close