S M L

दिल्लीत सत्ता 'आम आदमी' पक्षाची ?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 22, 2013 08:05 PM IST

arvinda kejriwal22 डिसेंबर : दिल्लीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे असून काँग्रेसच्या पाठिंब्यावर आम आदमी पक्षच दिल्लीत सत्ता स्थापन करेल अशी चिन्हे आहेत. आम आदमी पक्षाने जनतेची मत जाणून घेण्यासाठी घेतलेल्या सभांमध्ये दिल्लीकरांनी आपनेच सत्ता स्थापन करावी असा कौल दिल्याचे दिसते. याबाबत उद्या आप अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.

 

दिल्लीत आप सत्ता स्थापन करणार आहे की नाही याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज आम आदमी पक्षातर्फे दिल्लीत ठिकठिकाणी सभा सुरु आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे नेते निरनिराळे नेते या सभांना संबोधित करत असून सभेत जनतेची मत जाणून घेतली जात आहेत. यात बहुसंख्य लोकांनी सत्ता स्थापनेसाठी आपच्या पारड्यात मत टाकल्याचे समजते.

 

एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग साईटद्वारेही मत जाणून घेतली जात आहेत. संध्याकाळपर्यंत या माध्यमातून मतं मांडता येतील. त्यानंतर या मतांची मोजणीप्रक्रिया केली जाईल व उद्या सकाळी आप पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय जाहीर करेल असे समजते.   पक्षाचे आमदार मनीष सिसोदिया यांनीदेखील सत्ता स्थापनेचे सूतोवाच केले आहे. तर पक्षाचे आमदारच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडतील अस केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

 

सोमवारी दुपारी आपचे नेते सत्ता स्थापनेबाबत नायब राज्यपालांची भेट घेणार असल्याचे समजते. सत्ता स्थापनेत काँग्रेसचे समर्थन घेण्यात आले असले तरी  दिल्लीतल्या एका सभेत बोलताना केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. निवडणुकीतला विजय आमचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे, असंही केजरीवाल या सभेत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2013 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close