S M L

दिल्लीत 'आप'चं सरकार, केजरीवाल होणार मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Dec 23, 2013 01:23 PM IST

दिल्लीत 'आप'चं सरकार, केजरीवाल होणार मुख्यमंत्री

arvind kejrival23 डिसेंबर : दिल्लीमधला सरकारी तिढा सुटला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि इतर नेते नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा केला दावा केला आहे. आज सकाळी 'आप'ची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत याविषयीची घोषणा करण्यात आली. अरविंद केजरीवाल हे 26 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश असेल याविषयी 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, , अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. आपच्या राजकीय जडणघडणीत महत्त्वाचा साक्षीदार ठरलेल्या तर शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर होणार असल्याच ही त्यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाने विविध माध्यमांतून घेतलेल्या जनमतामध्ये सुमारे 7 लाख लोकांनी आपले मते मांडली. त्या पैकी 74 टक्के दिल्लीकरांनी 'आम आदमी पार्टीने सरकार स्थापन करावे या बाजूने कौल दिला, असं मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 28 जागा तर काँग्रेसला 8 जागा निवडून आले होते. आपला सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागांची गरज होती, ती गरज काँग्रेसने 18 पैकी 16 अटी मान्य करून बाहेरून पाठिंबा देत भरून काढली.

दरम्यान, आप आदमी पार्टीच्या धोरणांमुळे काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिलाय असं माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी म्हटले आहे. 'आप'चे नेते काँग्रेसविरोधात सध्या जी भाषा वापरचे ती त्यांनी यापुढे न वापरता, आणि दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करून दाखवाने, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. तर 'आप'ला सर्व आश्वासनं पूर्ण करता येणार नाहीत, असं भाजपचे नेते हर्ष वर्धन यांनी म्हटले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2013 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close