S M L

'आप'च्या नेत्यांनी आता काँग्रेसविरोधात नीट बोलावं -दीक्षित

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2013 07:11 PM IST

shila dixit23 डिसेंबर : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी सूर बदललाय. आम्ही आम आदमीला बाहेरुन पाठिंबा दिला असून त्यांच्या धोरणांमुळे काँग्रेसने हा निर्णय घेतलाय असं माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी म्हटलंय.

तसंच आम आदमीचे नेते काँग्रेसविरोधात सध्या जी भाषा वापरतात, ती त्यांनी यापुढे वापरू नये अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. 'आप'ने दिल्लीकरांना जी आश्वासनं दिली आहे, ती पूर्ण करुन दाखवावी असं आव्हानही दीक्षित यांनी केलं.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार असल्याचं आम आदमीने जाहीर केलंय पण त्यांना सत्ता स्थापनेसाठी राजकीय तडजोड करावीच लागली असा टोला भाजपचे हर्ष वर्धन यांनी लगावला. तसंच 'आप'ला सर्व आश्वासनं पूर्ण करता येणार नाहीत, तरीही त्यांना आमच्या शुभेच्छा आहे असंही हर्षवर्धन म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2013 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close