S M L

काँग्रेस दाखवणार 'आप'ला हात?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 25, 2013 01:48 PM IST

aap and congress24 डिसेंबर : दिल्लीत सरकार स्थापनेचा पेच अजून गुंतागुंतीचा होत चालला आहे. आम आदमी पार्टीची दिल्लीत सत्ता स्थापन करण्याआधीच 'आप'ला पाठिंब्या देण्याबाबत काँग्रेस फेरविचार करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मूळ काँग्रेसचे असलेले आणि नंतर इंडिया अगेन्स्ट करप्शनमधून आम आदमी पक्षात आलेले विनोदकुमार बिन्नी मंत्रीपद न मिळाल्यान त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन आपण गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निवडणूकीत पराभव स्वीकारून काँग्रेसने 'आप'च्या सर्व 18 मागण्यांवर सहमती दाखवत आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दाखवली. यावर 15 दिवस खल केल्यावर आम आदमी पार्टीने काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला. पण, यानंतर एकाच दिवसात काँग्रेसमध्ये वाद उफाळला. आम आदमी पार्टीला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद असल्याचं समजते.

'आप'च्या मंत्रिमंडळात अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीया, राखी बीर्ला, गिरीष सोनी, सत्येद्र जैन, सौरभ भारव्दाज, आणि सोमनाथ भारती यांचा सामावेश केला आहे. विनोद कुमार बिन्नी यांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल. पण, त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याने विनोद कुमार बिन्नी पक्षावर नाराज झाले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पुतळ्याचे दहन केले आणि 'आप'ला विरोध दर्शवला. त्यामुळे 'आप'चा पाठिंबा काढून घेण्यावर काँग्रेस गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते. काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी तर दिल्लीकरांनी काँग्रेसविरोधी मतदान केले आहे. काँग्रेसने विरोधातच बसले पाहिजे, असं मत जनार्दन द्विवेदी व्यक्त केले आहे. त्यावर काँग्रेसचे दुसरे नेते अहमद पटेल यांनी सारवासारव केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2013 09:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close