S M L

महिलेवर 'पाळत' प्रकरणी सरकार नेमणार चौकशी आयोग

Samruddha Bhambure | Updated On: Dec 26, 2013 07:48 PM IST

Image modi_2nd_day.jpgfghgf_300x255.jpg26 डिसेंबर : गुजरातमध्ये एका महिलेवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. गुजरात सरकारच्या आदेशावरून एका महिलेवर पाळत ठेवली गेली, या आरोपाची चौकशी ही समिती करणार आहे. हा निर्णय संघराज्य पद्धतीस मारक असून राजकीय सूडबुद्धीने घेतला असल्याची टीका भाजपने केली आहे.

या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाने तयार केला होता. या प्रस्तावास आजच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. ही चौकशी समिती पुढील तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार आहे. पुढील वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आसपास हा अहवाल सादर होऊ शकेल. सर्व अधिकृत कागदपत्रांची तपासणी करणे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे अधिकार या चौकशी समितीला आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2013 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close