S M L

गुजरात दंगल क्लेशदायी - नरेंद्र मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 27, 2013 06:39 PM IST

Image img_188492_modi_240x180.jpg27 डिसेंबर :  गुजरात दंगलीतील एहसान जाफरी हत्याकांड प्रकरणात काल अहमदाबाद कोर्टाने गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली. त्यानंतर मोदी यांनी आज पहिल्यांदाच दंगलींबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी एक ब्लॉग लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 2002ची घटना अत्यंत दु:खदायक आणि क्लेशदायक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. 2001मध्ये भूकंपाने गुजरात हादरला. त्यानंतर 2002च्या दंगली या गुजरातसाठी अनपेक्षित जबर धक्का होता, असं त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.

गुजरात दंगलींवरून मोदींचे राजकीय विरोधक आणि सामाजिक स्तरातून मोदींवर बरीच टीका झाली. गेल्या काही काळापासून विशेषत: भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यावर मोदींनी आपली प्रतिमा मध्यममार्गी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

गुजरात भूकंपानंतरच्या 2002च्या दंगलीमुळे आम्हाला आणखी एक अनपेक्षित हादरा बसला. निष्पापांचे बळी गेले. अनेक वर्षांच्या मेहनतीनं उभारलेली संपत्ती उद्धवस्त झाली. नैसर्गिक आपत्तीतून सावरत आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करणार्‍या, उद्धवस्त आणि दुखावलेल्या गुजरातसाठी हा गलितगात्र करणारा धक्का होता. मी अंतरबाह्य हादरलो. असा अमानुषपणा बघणार्‍याला जाणवणारं नखशिखांत रितेपण 'अतीव दु:ख', 'उदासिनता', 'दैना', 'वेदना', 'मनस्ताप', 'पराकोटीच्या यातना' या शब्दातून व्यक्त करता येत नाही. दंगलीत निर्दोष माणसं मारली गेली त्या दिवसांमध्ये मी अत्यंत दुख आणि वेदनेत होतो. ते दुख शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, असंही मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

मोदींच्या या ब्लॉगवर तात्काळ प्रतिक्रिया देत हे मोदींचे नक्राश्रू असल्याचं काँग्रेस नेते के. सी. त्यागी यांनी म्हटलं. माफी मागितल्याने त्यांनी केलेलं क्रौर्य बदलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी दिलीय. तर विरोधक गेली 12 वर्षं मोदींवर आरोप करत आहेत. याचं त्यांना किती दु:ख होतं हे या ब्लॉगवरून स्पष्ट होतं, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2013 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close