S M L

येडियुरप्पा लवकरच भाजपमध्ये परतणार!

Samruddha Bhambure | Updated On: Dec 30, 2013 01:39 PM IST

येडियुरप्पा लवकरच भाजपमध्ये परतणार!

yaddi30 डिसेंबर :  लोकसभेची निवडणूक जवळ येतेय आणि कर्नाटकच्या राजकारणातही हालचाली वाढल्यात. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक जनता पक्षाचे अध्यक्ष बी.एस.येड्डीयुरप्पा लवकरच भाजपमध्ये परत जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. येत्या मकर संक्रांतीनंतर ते परतण्याची तारीख जाहीर करणार आहेत. शिकारीपूरमध्ये रविवारी झालेल्या त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी भाषणाच्या दरम्यान हा आपल्या पक्षाचा शेवटचा मेळावा असून लवकरच आपण भाजपमध्ये परतणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदींना पाठींबा देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यात काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी भाजपमधला अंतर्गत कलहच कारणीभूत असल्याचंही ते म्हणाले. भाजप नेत्यानी एकरुप होऊन लोकसभा निवडणूक लढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

येडियुरप्पा यांच्या या घोषणानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं खाण घोटाळ्यात येडियुरप्पांचं नाव आल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2012मध्ये भाजपला राम राम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं सपाटून मार खाल्ला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फार मतं मिळणार नसल्यामुळंच त्यांनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2013 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close