S M L

आजारपणामुळे केजरीवाल घरीच राहणार!

Samruddha Bhambure | Updated On: Dec 30, 2013 01:49 PM IST

Image img_185142_kejriwal-social-activist_small_240x180.jpg30 डिसेंबर : दिल्लीचे नवीन मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल यांनी आजारपणामुळे आज घरीच रहावे लागणार आहे. त्यामुळे मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा लांबणार आहे.

आपल्या खराब प्रकृतीबद्दल केजरीवाल यांनी ट्वीटरवरून आपल्याला वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणतात,"कालपासून 102 एवढा ताप आहे. आज कार्यालयात जाता येणार नाही याचं फार दु:ख होतंय. आज कार्यालयात जाणं फार महत्वाचं होतं.आज आम्ही पाण्याचं धोरण जाहीर करणार होतो."

डॉक्टरांनी घरी बसून आराम करण्याचा सल्ला दिल्याने केजरीवाल कार्यालयात हजर राहणार नसले आहेत. मात्र पाणीपुरोठ्याच्या प्रश्नाबाबत आज दिल्ली जल बोर्डाच्या अधिकार्‍यांच्या सचिवांसोबत दुपारी बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपच्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांना 700 लीटर मोफत पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याबाबतचा निर्णय आज घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2013 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close