S M L

'आप'ची बेघरांसाठी निवारे बांधण्याची घोषणा

Sachin Salve | Updated On: Jan 1, 2014 10:32 PM IST

'आप'ची बेघरांसाठी निवारे बांधण्याची घोषणा

cm kejriwal01 जानेवारी : दिल्लीत 'आम आदमी' सरकारने कामाचा धडाका लावलाय. नव्यावर्षात आणखी एक निर्णय घेऊन दिल्लीकरांना दिलासा दिलाय. दिल्लीत येत्या तासांत 48 तासांत 45 नवे रात्र निवारे बांधण्यात येणार आहेत. असे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानी दिले आहे.

दिल्लीत कडाक्याची थंडी असून ऐन थंडीत बेघरांना उघड्यावर रात्र काढावी लागतेय. याबाबत 'आयबीएन-नेटवर्क'नं बेघरांचे हाल दाखवले होते. याची दखल घेत केजरीवाल सरकारने तातडीने 45 नवे रात्र निवारे बांधण्याचे आदेश दिले आहे. दिल्लीत उद्या गुरुवारी केजरीवाल सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार आहे.

त्याआधी सरकारनं लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावलाय. दरम्यान, दिल्लीला वीजपुरवठा करणार्‍या तिन्ही वीज कंपन्यांचं ऑडिट करण्याच्या मुद्द्यावरून वीज कंपन्यांनी दिल्ली सरकारला उत्तर दिलंय. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे निकालापर्यंत थांबा असं उत्तर या कंपन्यांनी दिलंय. वीज कंपन्यांचं ऑडिट करण्यासाठी कॅग तयार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2014 10:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close