S M L

आता 9 ऐवजी 12 सिलेंडर मिळणार ?

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2014 10:50 PM IST

Image img_220832_gascylendermumbai_240x180.jpg01 जानेवारी : महागाईला वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकार नववर्षाची 'सवलती'त भेट देण्याची तयारी केलीय. नववर्षात सवलतीच्या दरात एलपीजी सिलेंडरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत वर्षाला 9 सिलेंडर सबसिडीच्या दरात मिळायचे आता या सिलेंडरची संख्या 12 होणार असल्याची शक्यता आहे याबाबत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज हे संकेत दिलेत.

मागील वर्षी सवलतीच्या दरात मिळणार्‍या सिलेंडरवर मर्यादा घालण्यात आली होती. सुरुवातील 6 सिलेंडरची घोषणा करण्यात आली होती. मात्र या निर्णयाच्या विरोधात विरोधक रस्त्यावर उतरले होते. तर जनतेतही मोठा रोष होता.

अखेर हो नाही म्हणत 6 वरुन 9 सिलेंडरची मर्यादा वाढवण्यात आली. त्यातच दोनच दिवसांपूर्वी सिलेंडरच्या दरात 220 रुपयांची वाढ करण्यात आली. अगोदरच सिलेंडरची संख्या कमी आणि त्यात दरवाढ आणि सर्वात विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीकाळ का होईन दिलासा देणारे निर्णय घेण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2014 10:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close