S M L

मंत्रिमंडळाचा संध्याकाळी विस्तार : राणे, आदिक , देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा

19 फेब्रुवारीआशिष जाधव , दिनेश केळुस्कर अखेर काँग्रेसला मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडला आहे. आज संध्याकाळी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नारायण राणे, गोविंदराव आदिक आणि दिलीप देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. नारायण राणे यांना पुन्हा एकदा महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.राजभवनात संध्याकाळी पाच वाजता शपथविधी होणार आहे. नारायण राणे, गोविंदराव आदिक, कालीदास कोळमकर, नसिम खान, दिलीप देशमुख यांची नावं चर्चेत आहेत. नारायण राणेंना नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं हवं आहे. हे खातं यापूर्वी विलासराव देशमुख आणि आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण सांभाळत आहेत. पण राणेंना गृहनिर्माण किंवा उद्योग या दोनपैकी कोणतंतरी एक खातं मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणेंना पक्षात घेऊन पक्षाचं त्यांचं पुन्हा पूनर्वसन केलं जात आहे, असं नाही. तर राणे हे चांगले अनुभवी राजकारणी आहेत. शिवाय त्याची ओळख ही फक्त कोकणापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. येत्या आगामी निवडणुकांत काँग्रेस पक्षाला राणेंचा फायदा होणार आहे. हे लक्षात घेता राणेंना काँग्रेसनं पक्षात समाविष्ट केल्याचं दिसत आहे. कोकणात आंगणेवाडीला भराडीदेवीची जत्रा भरली आहे. आई भराडी देवीच्या दर्शनासाठी राणे आंगणेवाडीला गेले आहेत. "आगामी निवडणुकांत विजय फक्त काँग्रेसचाच होईल, असं गा-हाणंही राणेंनी घातलं आहे. " मी गेली 40 - 42 वर्षं राजकारणात आहे. अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. पक्षात राहून पक्षाला जिंकून जेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांत काँग्रेसचा विजय होईल त्या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे, " असं राणेंनी सांगितलं. आज मुंबईत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राणेंना नगरविकास हे खातं हवं असल्याची चर्चा आहे. त्याबाबत राणेंना विचारलं असता ते म्हणाले, " मला कोणतंही खातं चालेल. पण पक्षात राहून पक्षाच्या विकासासाठी काम करणं हे महत्त्वाचं काम आहे, " असं राणे म्हणलो.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 02:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 02:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close