S M L

वंदना सूर्यवंशींवर गुन्हा दाखल करा - आंदोलकांची मागणी

19 फेब्रुवारीअलका धुपकर एमएमआरडीमध्ये आत्महत्या केलेल्या संतोष भोसले प्रकरणी सहा दिवस उलटून गेले तरी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे तातडीने याप्रकरणीची चौकशी करुन एमएमआरडीएच्या तत्कालीन पुनर्वसन अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज झोपडपट्टी रेल्वे पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष अख्तर अली यांनी या पोलीस स्टेशनमध्ये दिलाय.भोसले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, आरोपांत तथ्य असल्यास सूर्यवंशीवर गुन्हा दाखल करा, आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवा, भोसलेंसारखी आत्महत्येची वेळ अन्य कुणावर आणू नये, सहभागी अन्य अधिकार्‍यांची करा चौकशी या सहा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. संतोष भोसले यांनी आपल्या आत्महत्येला सूर्यवंशी जबाबदार असल्याचा आरोप शेवटच्या चिठ्ठीत केला होता. त्यामध्ये तथ्य आढल्यास भारतीय दंड संहिता 306 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होउ शकतो. अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल होण्याची मागणी करणारा अर्ज दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत पोलिसांनी पुढील योग्य ती कारवाई पूर्ण करण्याचे मुंबई हाय कोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात बीकेसी पोलीस स्टेशन काय कारवाई करतंय, याकडे आंदोलकांचं लक्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 10:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close