S M L

गाझियाबादमध्ये 'आप'च्या कार्यालयावर हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Jan 8, 2014 03:14 PM IST

गाझियाबादमध्ये 'आप'च्या कार्यालयावर हल्ला

aap office08 जानेवारी : गाझियाबादमधल्या कौशंबीमध्येअसलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर आज हल्ला करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. कार्यालयाबाहेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्याविरोधात घोषणाबाजी केली गेली. मुख्य म्हणजे हे कार्यालय केजरीवाल यांच्या निवासस्थानाजवळ आहे.

हिंदू रक्षा सेनेच्या 30-40 कार्यकर्त्यांनी 'आप'च्या कार्यालयावर हल्ला केला. 'आप'चे नेते प्रशांत भूषण यांनी काश्मीर राज्यात लष्कराच्या नियुक्ती संदर्भात जनमत चाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून हा हल्ला केल्याचं हिंदू रक्षा सेनेनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2014 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close