S M L

चांगले दिवस लवकरच येणार - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 9, 2014 01:16 PM IST

modi speech09 जानेवारी : भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही, चांगले दिवस लवकरच येणार आहेत, असं सुचक वक्तव्या भाजपचे पंतप्रधान उमेदवार नरेंद्र मोदी आज केलं. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा संदर्भ घऊन चांगले दिवसांसाठी फक्त 4-5 महिन्यांची वाट पाहीवी लागणार असल्याचं त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीत प्रवासी भारतीय दिनानिमित्तने पंतप्रधानांनी काल अनिवासी भारतीयांना संबोधित करताना भविष्याबद्दल चिंतेचे काहीच कारण नसून भारताचं भविष्याकाळ उज्जवल असल्याचं म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी आज अनिवासी भारतीयांसमोर बोलताना भारतास भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील, असे सांगितले. अनिवासी भारतीयांना भारताचा कायमच पूर्ण पाठिंबा मिळेल, असे आश्‍वासन मोदी यांनी यावेळी दिले. त्याच बरोबर, देशाच्या राज्यांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर स्पर्धा होत आहे, ही चांगली बाब आहे. जगाचे लक्ष आता भारताच्या राज्यांकडेही लागल असल्याचं ही मोदी म्हणाले.

आगामी काळात महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती येणार आहे. त्याचबरोबर २०२२ साली भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होता आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळी जगामध्ये भारताची प्रतिमा कशी निर्माण करता येईल, याचा विचार आत्तापासूनच केला गेला पाहिजे. एक भारत श्रेष्ठ भारत या दिशेने प्रवास करायला हवा, असेही मोदी म्हणाले.

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्यासंदर्भातही अनिवासी भारतीयांना मदत करण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केला. "सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला दिलेले योगदान पुढच्या पिढ्यांना स्मरणात रहावे, यासाठी त्यांचा पुतळा बांधण्याची आमची योजना आहे,'' असे मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2014 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close