S M L

किरण बेदींचं मत मोदींना

Samruddha Bhambure | Updated On: Jan 10, 2014 04:09 PM IST

Image kiran_bedia_300x255.jpg10 जानेवारी :  माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा व्यक्त केला आहे.

किरण बेदी या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीत अरविंद केजरीवाल यांच्या सहकारी होत्या.

एक स्वतंत्र मतदार म्हणून आपला नरेंद्र मोदींना पाठिंबा आहे, असं बेदी यांनी म्हटलं. ज्यांना घोटाळामुक्त देश हवा आहे, ते नक्कीच काँग्रेसला पाठिंबा देणार नाहीत, आणि हे त्यांचं वैयक्तिक मत असून यामध्ये अण्णा किंवा चळवळीचा संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावर भाजपने आता किरण बेदींना पक्षामध्ये आमंत्रित करावे, असं भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामीं यांनी म्हटलं आहे.

किरण बेदी ट्विटरवर म्हणतात,

"आपल्यापैकी ज्यांना घोटाळेमुक्त देश हवाय, ते काँग्रेसला परत सत्तेत आणणार नाहीत! त्यासाठी भारताला स्थैर्य आणि अनुभवी नेत्याची गरज आहे! माझ्यासाठी सर्वात आधी भारत! स्थिर, सुशासित, सुप्रशासित, जबाबदार आणि सर्वसमावेशक. एक स्वतंत्र मतदार म्हणून माझं मत नमोंना."

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2014 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close