S M L

भारत पोलिओमुक्त ?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2014 10:50 AM IST

भारत पोलिओमुक्त ?

polio13 जानेवारी :  भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानास्पद आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन भारताला अधिकृतरित्या पोलिओमुक्त जाहीर करणार आहे. कारण आपल्या देशात तीन वर्षांमध्ये एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळला नाही.

विशेष म्हणजे, 2009 सालापर्यंत जगातले 50 टक्के पोलिओ रूग्ण भारतात आढळून आले होते. गेल्या काही वर्षांपासून भारत पोलिओमुक्त होण्यासाठी वर्षाला एक हजार कोटी रुपये खर्च करतोय. सरकारने आणि अन्य एनजीओने वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्थरावर 'पोलिओमुक्त भारत' ही मोहीम राबवली होती. यासाठी 5 वर्षांच्या आतील मुलांना रेल्वे स्टेशन, शाळा, सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य पोलिओ डोस देण्यात आले. सरकारच्या याच प्रयत्नांना आज खर्‍या अर्थाने यश मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2014 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close