S M L

एसबीआयनं ऑटोलोन देखील स्वस्त केलं

22 फेब्रुवारी मुंबईस्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांचं कारलोन सर्वात स्वस्त केलं आहे. काही दिवसांपूर्वी एसबीआयनं होमलोनदेखील स्वस्त केलं होतं, त्यामुळे ग्राहकांसाठी एसबीआय सर्वात स्वस्त व्याजदर देणारी बँक बनली आहे.देशातली सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय सध्या व्याजदर कमी करण्याच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. नुकतंच एसबीआयनं ऑटोलोन देखील स्वस्त केलंय. एसबीआयनं दहा टक्के दरानं व्याजदर देण्याची घोषणा केलीय. पण ही योजना फक्त एका वर्षासाठीच आणि नव्या ग्राहकांसाठीच आहे. नव्या कारसाठी घेतलेल्या कर्जावर व्याजदर एका वर्षासाठी दहा टक्के स्थिर राहील. एचबीआयची ही योजना 23 फेब्रुवारी ते 31 मे 2009पर्यंत सुरू राहील. एक जूननंतर त्यावेळी असणा-या व्याजदरांनुसार ग्राहकांसाठी व्याजदर ठरवले जातील. तोपर्यंत दहा टक्के दरानं घेतलेलं कर्ज ग्राहक 84 महिन्यात फेडू शकतात. पण ऑटोलोन देण्यापासून बँका नेहमीच पळ काढतात असं बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज म्हणतात. स्टेट बँक ऑफ इंडियानं ऑटोलोनसाठी व्याजदर कमी केले आहेत. पण इतर बँका अजूनही 11 टक्क्यांच्या वरच व्याजदर आकारत आहेत. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक ऑटोलोनसाठी 12.5 टक्के व्याजदर घेत आहेत. पीएनबी ऑटोलोनवर सव्वाअकरा टक्के व्याजदर लावते. एसबीआयनं होमलोनचे व्याजदरही कमी करून याआधीच खाजगी बँकांना स्पर्धेत ओढलं आणि त्यात आता ऑटोलोनची भर पडलीय. ऑटोलोनचे व्याजदरआयसीआयसीआय बँक 12.5%एचडीएफसी बँक 12.5%पंजाब नॅशनल बँक 11.25%

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2009 12:34 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2009 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close